भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये

jo na kale vedashastra ge maye | to gokuli choruni loni khaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥ एका जनार्दनीं ब्रह्मा परिपूर्ण । तया घालिती यशोदा भोजन ॥३॥