भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं

jyasi karanen chittashuddhi | karmen acharavin adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥ चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्त्वतां ॥३॥ चित्त झालिया निश्चळ । सहज राहील तळमळ ॥४॥ एकाजनार्दनीं मन । होय ब्रह्मारूप जाण ॥५॥