भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा

jhaliya gurukrupa sugam | sarvatra thaven parabrahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥ तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥ ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥ एका जनार्दनीं भाव । स्वयें आपणचि होय देव ॥४॥