भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती

jyasi nahin santasang | te abhang duhkh bhogiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥ अखंड नाम वाचे कीर्ति । संतसंग विश्रांती मज देई ॥३॥ मागणें ते द्यावें । आणिक मागणें जीवीं नाहीं ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ सोपा उपाय ॥५॥