भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली

jhala namapath jhala namapath | mokshamarga vat sopi jhali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥ आवडी आदरें नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तोडियेली शाखा अद्वैताची ॥३॥