भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान

tumachen namasankirtan | henchi majhen sandhyasnan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान ॥१॥ तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥ तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥ तुमच्या प्रेमें आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥ एका जनार्दनीं सार । ब्रह्मारुप हा संसार ॥५॥