भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे

tumache varnitan povade | kalikal payan pade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तुमचे वर्णिती बाळलीला । तें तुज आवडे गोपाळा ॥२॥ तुमचें वर्णील हास्यमुख । त्यांचे छेदिसी संसारदुःख ॥३॥ तुमचे दृष्टीचे दरुशन । एका जनार्दनीं तें ध्यान ॥४॥