भजनी मालिका

भजने

श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण ॥ महादेव ॥१॥ इंद्रियां अतीत आपण । देखिजें हें ज्ञान कारण ॥ महादेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥ धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥ वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥ डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें ॥१॥ आतां पहावें तें काये । जे पाहें तें आपणचि आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रवणीं कुंडलें ढाळ देती । हीरयापगंति दंत तैसे ॥१॥ तुळसि वैजयंती माळा । पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा ॥१॥ खेचरु विसा प्रेमाचा पिसा । तेणें नामा कैसा उपदेशिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥ मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥ संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२||

रचनाकार: संत जनाबाई

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥ उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥ कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी । कथेचि परवडी आवडती ॥१॥ तयाचा विस्तार तोचि बोलवीता । आहे सर्व सत्ता त्याचे हातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं । तैसाचि दंडकरण्यीं श्रीराम ॥१॥ एकें वधिले खरदूषण । एकें मर्दन कागबगा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥ ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायते म्हणत । जन्मला सुत देवकिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥१॥ सांवळें रुपडें कटीं ठेउनि कर । भक्त जयजयकार करिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ