भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली

shrikrushna janmala varta hi aikoni | chinta kansa manin pravartali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥ उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥ गौरवोनी त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥३॥ महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥४॥ नामा ह्मणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरिला तेणें कपट ॥५॥