श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण
shripandurangache darushan | vas pandharisi jan
श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण । कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥
shripandurangache darushan | vas pandharisi jan
श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण । कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥
shripad mhanati yachya doshastav | majhen punya sarva laya jaten
श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥ सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥
shrimukh changale kanse pitambar | vaijayanti har rule kanthi
श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥ तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥
shrimukh sajiren kundalen gomatin | tethen majhi drushti baisalise
श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥१॥ कटावरी कर समचरन साजिरे । देखावया झुरे माझें मन ॥२॥
shrimukh sajiren kundalen shobhati | shankh chakra hatin padma gada
श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा ॥१॥ पीतांबर कासें वैजंयंती कंठीं । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥
shrimukh sundar vatolen | kaisen nilotpal sanvalen
श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥ पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥
shrimukhachi shobha kasturi malavat | ubha ase nit vitevari
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥ कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥
shrimukhachen sukh pahatan pahatan | nayan tattvatan vedhalen majhen
श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें ॥१॥ सांवळां सुंदर कटीं ठेवुनीं कर । रुप तें नगर भीमातीरीं ॥२॥
shrimurti ase bimbali | tari he dehasthiti palatali
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥
shrimurti ase bimbali tari he dehasthiti palatali
श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म हृदयीं विठोबाचें नाम ||२॥
shriram aisen vadatanchi sachen | patak nasaten anant janmachen
श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें ॥१॥ श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥
shriram amhan soyara sangati
श्रीराम आम्हां सोयरा सांगाती । नाहीं पुनरवृत्ति जन्म कर्म ॥१॥
shriram jayaram vadatan vache | pataken jati koti janmanchi
श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाये शंकर उमा ॥२॥
shriram vyapak kin ekadeshi | hen sangaven majapashi | sakal dehin shriramasi | sthiti kaisi vastichi
श्रीराम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजपाशी । सकळ देहीं श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥ जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खाण । आत्माराम हें अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥
shriram shriram vache mhanatan | tenen sayujyata hatan lage
श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे ॥१॥ श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोची तपराशी पावन झाला ॥२॥
shriram soyara ala majhya ghara | didhala myan thara hladayin majha
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥ पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥
shriramanam pavan kshitin | namen doshan hoy shanti
श्रीरामनाम पावन क्षितीं । नामें दोषां होय शांती । नामेंचि उद्धरती । महा पातकी चांडाळ ॥१॥
shriramanamen tarilen pashan | namachen mahiman kon janen
श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥ उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥
shriramanamen tutati yatana | mhanoni ramarana drudh dhara
श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥ यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौर्याशींचे ॥२॥
shriramanen jagacha uddhar | karitan uchchar don aksharin
श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं ॥१॥ पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥