भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें

shriramanamen tarilen pashan | namachen mahiman kon janen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥ उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥ तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥