भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा

shriramanamen tutati yatana | mhanoni ramarana drudh dhara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥ यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौर्‍याशींचे ॥२॥ जन्ममरणाचा तुटेल तो बोध । ठसावतां बोध रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नामापरतें थोर । नाहीं नाहीं निर्धार केला व्यासें ॥४॥