भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची

shriram jayaram vadatan vache | pataken jati koti janmanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाये शंकर उमा ॥२॥ नाम थोर तिहीं लोकीं साजे । उफराटे वदतां पातक नासलें वाल्हाचें ॥३॥ एका जनार्दनीं नाम सारांचे सार । नामस्मरण तुटें भवबंध वेरझार ॥४॥