भजनी मालिका

भजने

श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्‍यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥ दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुंचे चरणकंज हृदयीं स्मरावें निगमनिखिल साधारण । सुलभाहुनि सुलभ बहू इतर योग याग विषमपथीं कां शिरावें नरतनु दृढ नावेसी ।

रचनाकार: संत रामदास

श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र ॥१॥ श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्रं ॥१॥ श्रीगुरुचें चरणत्रीर्थ । सकळां तीर्था करी पवित्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी ॥१॥ सकळ वेदांचि निजसार । श्रीसदगुरु परात्पर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥ परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुराया स्वामी दिनानाथा । उद्धरी अनाथा पांडुरंग ॥१॥ गुण निर्गुणरुपा देवा यतिवरा । त्रैलोक्य आधारा पाडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनीं विटेवरी ॥१॥ विटेवरी उभा आनंदें राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥ माना हाचि रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥ दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥ विटेवरी उभा वैकुंठनायक। आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत सेना

श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसी प्रचीत पहा देहीं । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीधरा अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारा -यणा ॥१॥ देवकी तनया गोपिकारमणा । भक्त उद्धारणा केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

श्रीपांडुरंग सदगुरु हें स्वामी । तया पादपद्मीं नमन माझें ॥१॥ गजाननमुर्ति सदगुरुसमर्थ । देई मज स्वार्थ निजपदीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ