भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी

shriguruchya charanagushthin | vanditi brahmadi dev koti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी ॥१॥ सकळ वेदांचि निजसार । श्रीसदगुरु परात्पर ॥२॥ श्रीगुरु नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपतीं दोनी ॥३॥ सदगुरुसी भावें शरण । एका जनार्दनीं नमन ॥४॥