भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या

shrigurupayin thevintun vishvas | dasacha tun das hoy tyanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥ परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥ वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंद्य त्रिभूवनीं झाला वाल्हा ॥३॥ एका जनार्दनीं गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तेंणें ॥४॥