भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं

shripandharisha patitapavana | ek vidnyapana payampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥ न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥ तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥