भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे

shrimukh sajiren kundalen gomatin | tethen majhi drushti baisalise

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥१॥ कटावरी कर समचरन साजिरे । देखावया झुरे माझें मन ॥२॥ माहेरीची आस दसर दिवाळी । बाहे ठेवी निढळी वाट पाहे ॥३॥ बंदिजन नामा उभा महाद्बारीं । कांर्ति चराचरीं वर्णितसे ॥४॥