भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली

shrimurti ase bimbali | tari he dehasthiti palatali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥ तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥ नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्ठल उभा आहे ॥४॥