भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम

shravanen nayan jivha shuddha kari | harinamen sohankari sarva kam

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥ मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥ रामनामें गणिका तरली अधम । अजामिळ परम चांडाळ दोषी ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा । एक वेळा बापा उच्चारीरे ॥ ४ ॥