भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य

antarichen guj bolun aisen kanhin | varna vyakta nahin shabda shunya

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥ जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥ परतल्या श्रुति म्हणती नेती । त्याही नादा अंतीं स्थिर राहे ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥ ४ ॥