भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा

shravanin sangitali mat mastakin theviyela hat | padapindavivarjit kela nama

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा ॥१॥ खेचरु विसा प्रेमाचा पिसा । तेणें नामा कैसा उपदेशिला ॥२॥ तया सांगितलें गुज । आतां पाल्हाळीं तुज काय चाड ॥३॥ मग खेचरू म्हणे मज ज्ञान हेंचि गुरु । तेणें ओगचरु म्हणे केला नामा ॥४॥