भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे

shravanamatren jalati papache parvat | aiken brahmagit shuk hmane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रवणमात्रें जळती पापाचे पर्वत । ऐकें ब्रह्मगीत शूक ह्मणे ॥१॥ धरूनि विश्वास करी जो पठण । तरेल तो जाण भवसिंधूं ॥२॥ आपण तरेल नव्हे हें नवल । कुळें उद्धरील सप्तही तो ॥३॥ एकेक अक्षर निर्दळील महा पाप । करा याचा जप शौनक हो ॥४॥ नाम घेतां धांवे अनवाणी पाय । कोमळ ह्लदय कृष्णाजीचें ॥५॥ न विचारितां याति कुळ अमंगळ । न पाहे काळ वेळ धांव घेई ॥६॥ शरणागता नेदी काळाचिये हातीं । नामा ह्मणे चित्तीं दृढ धरा ॥७॥