भजनी मालिका

भजने

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला ॥१॥ म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शून्य साकारलें साध्यांत दिसे । आकार नासे तेथें शून्याकार दिसे ॥१॥ शून्य तें सार शून्य तें सार । शून्यिं चराचर सामावलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।।

रचनाकार: संत आऊबाई

शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥ गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव