भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला

shubhasuchachinhen hotati shakun | tenen ton brahman anandala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला ॥१॥ म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥ उडती उजवे काग ते जोडयानें । भरल्या कुंभानें नारी देखें ॥३॥ तास भारद्वाज वामभागीं जाती । मयूर नाचती उत्साहानें ॥४॥ नामा म्हणे सर्व प्रश्नांचाही प्रश्न । वाचे नारायण नाम गातो ॥५॥