भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे

shunyavari shunya pahe tayavari shunya ahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे ।। १ ।। प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधः शून्य ॥ २॥ ऊर्ध्वशून्य श्वेतवर्ण मध्यमशून्य श्यामवर्ण ॥ ३॥ महाशून्य वर्ण नीळ त्यांत स्वरूप केवळ ॥४॥ अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥