भजनी मालिका
← भजनांकडे परत

शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों

shudravanshi janmalon | mhanoni dambhen mokalilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥ घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥२॥ सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥