भजनी मालिका

भजने

मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण ॥१॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमों ॥१॥ गुंजाहार गळां मयुरपुच्छे वेंटी । कृपाळु जगजेठी तुज नमों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥ धेनुदर्शन वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र ।उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मेघेंविण जळ कीं जळेंविण पूर । नख न बुडे परी नाहीं उतार ॥१॥ येथें आहे तो बुडे नाहीं तरे । लटिक्याचे खरें मानिसी काई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मेली म्हणती मजसी नोळखती पूर्ण विदेहस्थीती जाण नेणती मूर्ख ||१|| देह पडता जवळी येवोनी पाहतो। दुर्गंधी हो वास हाताचा तो॥२॥

रचनाकार: संत विठाबाई