भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी

meliyanchya randa iichchhati lekarun | laj nahin dharun priti kaishi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥ आन दिसे परी मरण चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥ तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥