भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेरूचीया माथां देऊनिया पाव

meruchiya mathan deuniya pav

रचनाकार: संत रामदास · अभंग
मेरूचीया माथां देऊनिया पाव । जात असे राव कैलासींचा। कैलासींचा राव अक्रावा क्षोभला । देशधडी केला लंकानाथ लंकेच्या चोहटा मांडियेला खेळ । आगीचे कल्लोळ घरोघरीं जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या जानकीचा शोक दुरी दुरावला । यशवंत जाला निजदास।