भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृत्युलोका माझारी गा एक सदगुरु साचार

mrutyuloka majhari ga ek sadaguru sachar

मृत्युलोका माझारी गा एक सदगुरु साचार । त्याचेनि दर्शनें तुटला हा संसार । पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार । यालागीं नांव त्याचें वेदा न कळे पार ॥१॥ धर्माचें वस्ति घर ठाकियलें वा आम्हीं । दान मागों ब्रह्म साचें नेघो द्वैत या उर्मी ॥२॥ विश्रांति विजन आम्हां एक सदगुरु दाता । सेवितां चरण त्याचे फ़िटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्पना आशा इळा परिसीं झगटतां । कैवल्य देह जालें उपरति देह अवस्था ॥३॥ मन हें निमग्न जालें चरणस्पर्शे तत्त्वतां । ब्रह्माहंस्फ़ूर्ति आधीं भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्य ज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा । अंध मग दृढ जालों निमाल्या विषयाच्या वार्ता ॥४॥ ऋध्दिसिध्दि दास्य आपेंआप वोंळलीं । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपीं लीन झाली । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जिवन मार्गु सतरावी हे वोळली ॥५॥ पांगुळा मी कल्पनेचा पंगु जालों पैं मनें । वृत्ति हे हारपली एका सदगुरु रुप ध्यानें । निवृत्तीसी कृपा आली शरण गेलों ध्येयध्यानें ॥६॥