भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमों

megh: sham varna jhalasi sagun | karya ani karan tuj namon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमों ॥१॥ गुंजाहार गळां मयुरपुच्छे वेंटी । कृपाळु जगजेठी तुज नमों ॥२॥ वनपुष्पमाळा अपाद शोभती । लक्षुमीच्या पति तुज नमों ॥३॥ वेणू वाजविसी गायी त्या चारीसी । न कळे कोणासी तुझी लीला ॥४॥ हातीं तुझ्या कवळ शोभे पीतांबर । चरण सुंदर तुज नमों ॥५॥ घेवोनी अवतार दुष्टांसी मारिसी । भक्तांसी रक्षिसी निरंतर ॥६॥ रावण कुंभकर्ण मारीसी आत्मारामा । सोड विलें आह्मां बंदीहुनी ॥७॥ तुझें मी बालक वेडें अविचारी । नामा ह्मणे करीं कृपा आतां ॥८॥