भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा

meghavrushtinen karava upadesh pari gurunen na karava shishya| vanta labhe tyas kelya ardhakarmacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र ।उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥ बीज न पेरावें खडकीं ।ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं ।पाठी लागे दिवाण ॥२॥ गुज बोलावें संतांशीं ।पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥ शुद्ध कसूनिपाहावें वरी रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥