भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेघ वर्ष निर्मळ जळ । जैसें बीज तैसें फळ

megh varsha nirmal jal | jaisen bij taisen phal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मेघ वर्ष निर्मळ जळ । जैसें बीज तैसें फळ ॥१॥ तया परी भक्ति कीजे । बीजासारिखें फळ घेईजे ॥२॥ उत्तम अलंकार गोमटे । तेथें नाक असे नकटें ॥३॥ भजना जातां लाज वाटे । वेश्याघरीं भांग घोटे ॥४॥ एका जनार्दनीं नर । प्रत्यक्ष जाणावा तो खर ॥५॥