भजनी मालिका

भजने

मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥ ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत ॥१॥ आले ग्रामव्दारापाशीं । धांविले सकळहि नगरवासी । कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें ॥१॥ जरी पितांबरें नेसविलीं नभा । चैतन्याचा गाभा नीलबिंदू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥ शिंगें पावे मोहर्‍या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥ हिंगा दुर्गधीची मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि ॥१॥ चित्तशुद्धि झालिया गुरुचरणसेवा । तेणें ज्ञानठेवा प्राप्त होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ