भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी

molen viken svabhavagunin | yeravi titen na puse koni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥ हिंगा दुर्गधीची मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥ भांगीं न भुलवीं भक्षिल्या । येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥ निळा म्हणे तैशिया परी । देवपणेंचि देवा थोरी ॥४॥