भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया

moksha muktiche ligad | vagavi avaghad kasaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥ एक नाम जपा कंठीं । राबती कोटी मुक्ति देखा ॥२॥ मोक्ष तेथें जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥ एका जनार्दनीं देखा । मुक्ति फुका राबती ॥४॥