भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते

moksha muktichen thevanen | deti penen sant te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥ नाहीं सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥ नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ हातां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतसमान देवाच्या ॥४॥