भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि

moh mamata hi samul nashavi | tevhachi pavavi atmashuddhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि ॥१॥ चित्तशुद्धि झालिया गुरुचरणसेवा । तेणें ज्ञानठेवा प्राप्त होय ॥२॥ एका जनार्दनीं प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्मा परिपुर्ण अनुभवेल ॥३॥