भजनी मालिका

भजने

माझें घर तुवां पूर्वीच बुडविलें जें दर्शनासी आलें बाळ माझें ।।१।। नेणों काय वर्म तुझें सांपडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिलें त्याची खूण सारू ऐका ॥१॥ अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवतां आदित्य रोहिणीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥ कांहीं च न वंचीं आजिच्या प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे बापाचे निधनें वडिवार बोलसी । ते तूं घेवोनि आलासी उजागरपणें ॥१॥ उगलाची देईं लावूं नको दावा । केशवासी ठावा आहे तुझा जीवभाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम ॥१॥ व्यक्ति येणें घडे त्याची या आवडी । युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव