भजनी मालिका

भजने

माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।

रचनाकार: संत तुकाराम

माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥ पडिली गांठी या गुणसवें । एकनिष्ठ वो शरण जातां भावें । मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे । झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥ देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥ देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

माझे मनीं जें जें होतें तें तें दिधलें अनंतें ।।१।। देह नेउनी विदेही केलें शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

माझे मनींज ऐसें होतें आतां देवा । भाव समर्पावा तुझे चरणीं ॥१॥ तंव मायामोहें मजसी केला हेवा । लोटियेलें भवजळामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥ वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली ॥१॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥ तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ