भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं

majhe maj kalalen majhen maj kalalen | nahin paraten kelen apanatunin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें भाव । सर्वाभूतीं देव दाखविला ॥३॥