भजनी मालिका

भजने

माझी मज आली रोकडी प्रचीत। होऊनि फजित दुःख पावे ॥१॥ काहीं द्वेष त्याचा करितां अंतरी। व्यथा या शरीरीं बहुत झाली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥ आलें वाचें तेंचि करितें बडबड । नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड । मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥ विसरणे रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती ॥१॥ नका देऊ भक्ती मुक्ती । माझी परिसावी विनंती ॥२॥

रचनाकार: संत सावता

माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥ हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा ।

रचनाकार: संत जनाबाई

माझें अचडें बचडें छकुडें गे राधे रूपडें पांघरूं घालीत कुंचडें ।।धृ।। हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा पानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥

रचनाकार: संत जनाबाई

माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे गुणदोष जरि विचारिसी । सर्व नारायण अपराधी ॥१॥ सेवाहीन दीन पातकाची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥ नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव