भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे गुणदोष जरि विचारिसी । सर्व नारायण अपराधी

majhe gunadosh jari vicharisi | sarva narayan aparadhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे गुणदोष जरि विचारिसी । सर्व नारायण अपराधी ॥१॥ सेवाहीन दीन पातकाची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥२॥ अंगुष्ठ धरूनि मस्तकापर्यंत । अखंड दुष्कृत आचरलोंज ॥३॥ स्वप्नामाजी तुझी घडली नाहीं भक्ति । पुससी विरक्ति कोठोनियां ॥४॥ तूंचि माझा गुरु तुंचि माझा स्वामी । सकळ अंतर्यामीं वससी तूं ॥५॥ नामा म्हणे माझें चुकवी जन्ममरण । न करीं मी सीण पांडुरंगा ॥६॥