भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु

majhi mata dattaguru | maj tichachi adharu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥ तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥ दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥ निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥