भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली

majhe manorath pavale jain siddhi | tai payin buddhi sthiravali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली ॥१॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥ त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥ जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरींमावळलें ॥४॥ तुका म्हणे माप भरु आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥