भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं

majhen man rakhoni payin | kara samadhan dehin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं ॥१॥ हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥ ब्रह्माज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥ भुक्ति मुक्ति नका आड । ब्रह्मा सायुज्यता भीड ॥४॥ लागती चरणा । शरण एका जनार्दना ॥५॥