भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ

majhen man ati chanchal | tyasi bandha tumhin sabal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ ॥१॥ मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥ सुखदुःखाचेम कारण । मनचि हें अधिष्ठान ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनें मनासी बंधन ॥४॥