भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय

majhen jivan tujhe pay | krupalun tun majhi may

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥ जन्ममरण तुजसाठी । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥ तुका म्हणे तुजविण । कोण हरील माझा सीण ॥३॥