भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम

majhe bhakta maj anusarale chitte | tyahuni padhiyante maj anik nahim

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम ॥१॥ व्यक्ति येणें घडे त्याची या आवडी । युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥ त्याचेनि कृतार्थ असेम मी पूर्णकाम । ते माझे परम प्राणसखे ॥३॥ ते माझे आश्रम मी त्यांचा विश्राम । जीहीं रुपनाम केलें मज ॥४॥ मी त्यांचा सोयरा ते माझे सांगाती । करी त्यांसी एकांति सुखगोष्टी ॥५॥ जीहीं तनुमन प्राण लाविला मजकडे । मी तयां आवडे जीवाहुनि ॥६॥ ते माझ्या भाग्याचे अधिकारी विभागी । वैकुंठ त्या लागीं वसतें केलें ॥७॥ त्यांचे गुज गौप्य मीची एक जाणें । माझी प्रेमखूण कळकी तयां ॥८॥ मनाची साउली कनोनियां माते । भोगिती आतां ते प्रेमसुख ॥९॥ आपुलियाचीं किरणें विराजे गभस्ती । परी किरणें तीं नव्हती आन जेंवीं ॥१०॥ तैसे माझे दास मजमाजीं उदास । असती समरस दुजेनविण ॥११॥ मी तो भक्तरुप भक्त माझें स्वरुप । प्रभा आणि दीप जयापरी ॥१२॥ हे खूण अनुभवी जाणती ते ज्ञानी । ज्या नाहीं आयणी कासयाची ॥१३॥ त्यांचिये चरणींचे रजरेणु माझें नामें । जें सांडिलें रजतमें सत्वशीळ ॥१४॥ त्यांचे भेटीलागीं हदय माझें कळवळे । कैं देखेन डोळे निवती माझे ॥१५॥